औरंगाबाद- करोना महामारीने अनेकांना वाईट दिवस दाखविले आहेत. करोनासोबतच त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकड़ाऊनमुळे सुद्धा अनेकांचा बळी गेला आहे. अशीच आज एक घटना समोर आली आहे.औरंगाबादेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केली आहे.
महेश पाटील शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या ‘छावा’च्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नैराश्यातून महेशने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. आत्महत्येपुर्वी महेशने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ही घटना नेवासा-नगर महामार्गावरील वाघाडी गावाजवळ घडली.
महेश फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाला, ”आयुष्य खूप छान आहे पण त्याचे जवळचे लोक sobat असतिल तर माझही आयुष्य खूप सुंदर होत ..पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही…मला जगता आल नाही…khup प्रेमाचे लोक भेटले..माझे मित्र तर एवढे ना की.कोणाचा जीव घेतील मी म्हणलो तर…पण असो…माझ्या आयुष्यात..खूप त्रास आहे…जो मी konala sangu shakat nhi……pn mazi ek echha ahe mazya मृत्यु ला कोणालाही जबाबदार ठरवू नये… मी मझ्या त्रासामुळे मरतोय… माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मझ्या जिवलागांना खूप खूप धन्यवाद… thank u so much all”
महेशने अहमदनगर-नेवासा मार्गावरील वाघाडी गावाजवळ दुचाकी बाजूला उभी करुन भरधाव जाणाऱ्या एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केली असून आत्महत्येपुर्वी एक पोस्ट टाकली त्यामध्ये फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नका, अशी पोस्ट टाकली आहे.