शिक्रापूर (वार्ताहर) – येथील चाकण रस्त्यावरील परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय युवकाने तोंडामध्ये बोळा कोंबून घराच्या पाठीमागे असलेल्या उंच झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सचिन बाळासाहेब गवारे (वय 30 रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बाळासाहेब बबन गवारे यांनी खबर दिली आहे. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मी मेल्यावर माझा फोटो ठेवतील का ?
रविवारी अभिनेता सुशांत सिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर अनेकांच्या मोबाइलवर अभिनेता सुशांत सिंह याचे फोटो झळकू लागले यावेळी सचिन याने हा अभिनेता मेला तर सगळेजण मोबाइलवर त्याचे फोटो ठेवतात, मी मेलो तर कोणी माझा फोटो ठेवेल का असा सवाल हसत हसत काही मित्रांना केला होता आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास सचिनने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली आणि मित्रांच्या मोबाइलवर त्याचा फोटो ठेवण्याची वेळ आणली.