मुंबई : टिव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या सेजल शर्मा या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड भागातील राहत्या घरीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आले.
सेजल शर्माला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी संगितले. पोलिसांनी एक सुसाइड नोट जप्त केली आहे, त्यात सेजल शर्मा हिने वैयक्तिक कारणास्तव अत्यंत कठोर पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील रहिवासी असलेली सेजल शर्मा काही वर्षांपूर्वी अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला आली होती. ‘दिल तो हैप्पी है जी’ या टीव्ही सीरियलमध्ये ती काम करत होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी मीरा रोड पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.