सुप्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सुपा – पारनेर तालुक्‍यातील पिंपरी गवळी येथील रहिवाशी व सध्या सुपा येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले चंद्रकांत मनाजी मांडगे (वय 36) यांनी शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या पश्‍चात आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुपा येथील सुप्रसिद्ध मांडगे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे ते मालक होते.

दरम्यान घटनेची माहिती सुपा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पारनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. सुपा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात करण्यात आल्यानंतर, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पिंपरी गवळी येथे दुपारी 1.30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती सुपा परिसरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास शिवाजी ढवळे हे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.