वांबोरी, वरवंडी येथे दोघांची आत्महत्या

राहुरी  – राहुरी तालुक्‍यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. वांबोरीत प्रेम प्रकरणातून आत्महत्या झाल्याचे समजते. राहुरी पोलिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय 23 रा. ससे गांधले वस्ती, वांबोरी) हा कॉलेज तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलीस ठाण्यातील हवालदार शैलेश सरोदे, अशोक तुपे आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

त्यानंतर शवविच्छेदनासाठी तो पाठविण्यात आला. प्रमोद भोसले या कॉलेज तरूणाचे याच परिसरातील एका तरूणीबरोबर काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी. तसेच प्रमोद भोसले या तरूणाने आत्महत्या केली आहे की, त्याची हत्या करून त्याला झाडाला लटकविण्यात आले, अशी परिसरातील नागरीकांमधून चर्चा सुरू आहे. या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वांबोरी पोलीस करीत आहेत.

दुसरी घटना वरवंडी येथील बाळासाहेब लहानू जाधव या (38) वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब जाधव हे 10 डिसेंबरच्या रात्री आपल्या घरात एकटेच झोपले होते. सकाळी उशीरापर्यंत त्यांनी घराचे दार उघडले नाही. म्हणून शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.