नगर – तालुक्यातील शिंगवे नाईक इस्लामपूर येथे गाईंच्या गोठ्याचे शेड बांधण्यावरून झालेल्या हाणामारीत एकास लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. त्या वाचविण्यासाठी मधे पडलेल्या मुलालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत लक्ष्मण किसन काळे, किसन यशवंत काळे अरुण लक्ष्मण काळे, (सर्व रा. शिंगवे नाईक, इस्लामपूर, काळे वस्ती) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आजे.
या मारहाणीत बाळासाहेब यशवंत काळे हे जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी बाळासाहेब काळे हे गायींच्या गोठ्यासाठी शेड बांधत होता त्यावर लक्ष्मण काळे याणे त्याला आक्षेप घेत तू येथे शेड बांधायची नाहीस असे बजावले त्यावर बाऴासाहेबाने माझ्या जागेवर बांधतो आहे असे उत्तर दिल्याने रागाविलेल्या लक्ष्मण याने बाळासाहेब यास गजाने मारहाण केली त्यांना वाचविण्यासाठी मधे पडलेल्या मुलास अरुण व किसन काळे यांनी मारहाण केली.