मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई – आज दुपारी मुंबईतील मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रियांका गुप्ता असं या तरुणीचं नाव असून काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती. मात्र अचानक या तरुणीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याने खळबळ उडाली. मात्र संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला.

दरम्यान, पोलिसांनीच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणीला संरक्षक जाळीतून बाहेर काढले. आणि या तरुणीला ताब्यात घेतले. प्रियांका गुप्ता ही तरुणी उल्हासनगर येथील रहिवाशी असून, गेल्या काही दिवसांपासून ती मंत्रालयात येत होती. असं चौकशी दरम्यान उघडकीस आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.