सुहानाचा पोल डान्स व्हायरल

बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिच्या बॉलीवूड प्रवेशाबाबत अनिश्‍चितता आहे. पण तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे तिला प्रसिद्धी मिळत आहे. सुहानाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खपूच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच सुहाना व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या शॉर्टमध्ये पोल डान्स करताना दिसते. या व्हिडिओला सुहानाने “सुहाना खान डांसिंग विद हर फ्रेंड्‌स’ असे नाव देत त्याच्यासोबत किसिंग आणि हार्ट इमोजी शेअर केली आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून अनेकांनी त्याला लाइक केले आहे.

सोशल मीडियावर सुहाना खूपच पॉप्युरल असल्याने अनेक वेळा चाहते तिचे वडिल शाहरुख खान यांना तिच्या चित्रपटाच्या पर्दापणाबाबत विचारत असतात. त्यावर शाहरुख म्हणतो की, सुहाना सध्या शिक्षण घेत आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या करिअरची निवड करेल. जर तिला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे असेल, तर मी निश्‍चितच तिला मदत करेन, असे त्याने सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.