सुहाना खान घेतेय ऑनलाईन डान्स प्रशिक्षण

करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. नेहमी बीझी असणारे सर्व सेलिब्रेटी सध्या आपापल्या घरी आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सुद्धा तिच्या आवडीचे काम करत आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे सुहाना खान घरातच अडकली आहे. त्यामुळे तिला डान्स क्‍लासला जाता येत नाही आहे. पण म्हणून म्हणून ती शांत राहिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

You talkin to me??? (Pls get it lol) 🚕

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on


सुहाना सध्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घरीच डान्स शिकत आहे. सुहानाची बेली डान्स टीचर संजना मुथरेजाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात सुहाना तिच्याकडून व्हिडिओ कॉलवर नृत्याचे धडे घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

@theodoregimeno ❤️

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on


संजनाने दोन फोटोंचे कोलाज करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये संजना आणि सुहाना एकत्र दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये या दोघी व्हिडिओ कॉलवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये संजनाने सांगितले की, यातला पहिला फोटो हा डिसेंबर 2019चा आहे तर दुसरा फोटो मे 2020 मधला आहे. संजना मुथरेजाकडे फक्‍त सुहाना खानच नाही तर अनन्या पांडे, शनाया कपूर या दोघी सुद्धा ऑनलाइन बेली डान्स शिकत आहेत. सुहाना खान तिच्या ग्लॅमरस लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×