नवी दिल्ली – करोनावर उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने हे औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत.
4 ते 5 हजार रुपयांना उपलब्ध असणारे हे औषध 60 हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. यासंदर्भात काही पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सर्व परिस्थितीचा विचार पाहता हे औषध तयार करणाऱ्या कंपन्यांनी हे उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे औषधी विभागाने म्हटले आहे. काळाबाजार होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.