पुणे – जानेवारीअखेर देशात 141.12 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत 185.59 लाख टन हे उत्पादन झाले होते. सध्या 446 साखर कारखाने सुरू असून, गेल्या वर्षी 520 कारखाने सुरू होते.
देशात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 54.96 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र असून, आतापर्यंत ( 31 जानेवारीअखेर) 34.64 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
गेल्यावर्षी 70.69 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकमध्ये 27.94 लाख टन, तर तामिळनाडूत 2.05 लाख टन साखरचे उत्पादन झाले आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये 2.34 लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती इंडियन शुगर असोसिएशनने दिली आहे.