पुणे : आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे आठवड्याभरात साखरेच्या भावात आठवडाभरात क्विंटलमागे ५० रुपयांनी घट झाली आहे. शेंगदाण्याच्या भावातही क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांची घसरण झाली. हरभराडाळ आणि बेसन भावात आणखी घट झाली असून, अन्नधान्ये, खाद्यतेलांचे भाव दर स्थिर आहेत. मात्र, भाताच्या दरवाढीमुळे पोह्यांच्या दरात आणखी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असून, कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यामुळे बाजारात साखरेची मुबलकता असून, दरात घसरण होत आहे. गेल्या आठवड्यातही क्विंटलमागे ५० रुपयांनी घट झाली. सर्वत्र गुऱ्हाळे जोमाने सुरू झाली असून, गुळाची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. संक्रातीच्या सणासाठी विविध पदार्थ बनवण्यासाठी चिक्की गुळाची आवश्यकता असते. यासाठी चिक्की गुळाचे उत्पादन सुरू झाले असून, बाजारातही या गुळाची आवक सुरू झाली आहे. कराड चिक्की गुळाचे दर सर्वाधिक असून, केडगाव चिक्की गुळाचे दर कमी आहेत. संक्रातीच्या सणाची मागणी असल्याने आता गुळातील घसरण थांबली आहे.
दरम्यान, हरभरा डाळ, बेसनच्या भावात घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियातून हरभऱ्याची मोठी आयात झाली आहे. त्यामुळे हरभराडाळीचे दर मंदीतच आहेत. गेल्या आठवड्यातही हरभराडाळ दरात क्विंटलमागे, तर बेसन दरात ५० किलोमागे आणखी शंभर ते दीडशे रुपयांनी घट झाली. खराब हवामानामुळे तूरडाळीची आवक अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे अद्यापही दर तेजीतच आहेत. अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर आहेत.
गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अन्न महामंडळामार्फत एकूण पंचवीस लाख टन गहू विकण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गव्हाची दरवाढ थांबण्यास मदत झाली आहे. मात्र तुटवड्याचे प्रमाण लक्षात घेता विक्रीचे प्रमाण कमी असून, ते वाढविणे गरजेचे आहे, असे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गहू, ज्वारी, तसेच तांदळाचे दर स्थिर होते. शेंगदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या नव्या भुईमूग शेंगेची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मध्य प्रदेशात टीजे जातीच्या शेंगांचे उत्पादन जास्त प्रमाणात झाले आहे. यामुळे या शेंगदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात दरात क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांनी घट झाली आहे. जाडा, घुंगरू आणि स्पॅनिश शेंगदाण्याच्या दरातही क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी घट झाली आहे.
साधारणपणे दिवाळीनंतर पोह्यांचे दर कमी होतात. मात्र, तांदळाच्या तुटवड्यामुळे आणि दरवाढ कायम असल्याने दर कमी न होता उलट वाढत आहेत. नवा भात निघाला असला, तरी दर उंच असल्यामुळे दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या पोह्यांच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात खाद्यतेलांच्या दरात कसलाही बदल आढळला नाही. वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाचे दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) ३६७५-३७२५ रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २४५०-२५३०, रिफाइंड तेल २१५०-२७५०, सरकी तेल
१९७५-२३००, सोयाबीन तेल १९५०-२२००, पामतेल १९००-२०५०, सूर्यफूल रिफाइंड तेल २०५०-२२००,
वनस्पती तूप २०७०-२३५०, खोबरेल तेल ३४००-३५०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसुरी ४५००-५०००, एचएमटी कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१)-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९)- ८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू – लोकवन नं. १ ४४००-४५००, लोकवन नं. २ – ३९००-४२००, नं. ३ – ३४००-३६००, सिहोर नं. १- ५७००-६०००, सिहोर नं. २- ५०००-५०००, सिहोरी ४०००-४४००, मिलबर ३३००-३३५० रु.
ज्वारी :- गावरान नं. १- ५२००-५५००, गावरान नं. २- ४५००-४८००, नं. ३- ३५००-३८००, दुरी नं. १- ३६००-४०००, दुरी नं. २- ३२००-३५०० रु.
बाजरी:- महिको नं. १- ३७००-३८००, महिको नं २- ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु.
गूळ :- गूळ एक्स्ट्रा ४०००-४२५०, गूळ नं. १ – ३७२५-३९२५, गूळ नं. २ – ३६००-३७५० गूळ नं. ३- ३४००-
३५२५, चिक्की बॉक्स पॅकिंग ४३००-४७००, कराड बॉक्स पॅकिंग ४४००-५०००, केडगांव बॉक्स पॅकिंग ३१००-४१०० रु.
डाळी:- तूरडाळ १३०००-१६५००, हरभराडाळ ८०००-८२००, मूगडाळ ९८००-१००००, मसूरडाळ ७६००-
७७००, मटकीडाळ ८२००-८३००, उडीदडाळ १००००-१२५०० रु.
कडधान्ये:- हरभरा ७८००-८०००, हुलगा- ७२००-७५०० चवळी ९०००-११०००, मसूर ६८००-६९००, मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००-६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम ९५००-१००००, वाटाणा हिरवा १७०००-२००००, वाटाणा पांढरा ४२००-४३००, काबुली चणा १२०००-१६००० रु.
साबुदाणा :– साबुदाणा नं. १- ६५००, साबुदाणा नं. २- ६०००, साबुदाणा नं. ३- ५८०० रु.
वरई भगर :- १०५००, सावा भगर १०००, गोटा खोबरे १८००-२००० रु.
शेंगदाणा :- जाडा ९५००-९०००, स्पॅनिश – १००००-१०५०० घुंगरू ९५०० टीजे ७२००-७२००
धने :- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४७००-५०००, पेण ४३००-४५००, मध्यम पोहा ४७००-४९००, दगडी पोहा ४७००-५१००, पातळ पोहा ५०००-५८००, सुपर पोहा ५३००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६२५-७२५, भाजके डाळे ४०००-४४००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५६०, भडंग ९००-१०५०, घोटी ५५० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १७५०-१८००, रवा १९३०-१९८०, मैदा १९३०-१९८० रु.
बेसन :- (५० किलोस) ४६५०-४९५० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी ३००००-३५०००, ब्याडगी १८०००-२१०००, लवंगी तेजा २०००-२२०००, गुंटूर १८०००-२००००, खुडवा गंटूर ७०००-८०००, खुडवा ब्याडगी ८०००-९००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ३८००-३९००, पालकोल जुना २१००- २२००, सापसोल ३८००-३९०० रु.