अपघातानंतर मारहाण; तिघांना अटक

पिंपरी  – दोन मोटारसायकलीच्या अपघातानंतर बाजूने जाणाऱ्या चारचाकी गाडीला अडवून गाडीमधील पिता-पुत्राला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार भोसरी – इंद्रायणीनगर येथील वैष्णोदेवी मंदिरासमोर घडला. योगेश रामजनम शहा (वय 21), जितेश झुलन यादव (वय 21) आणि सुरज नारायण शर्मा (वय 18, तिघे रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी नरेंद्र ज्ञानेश्‍वर लांडगे (वय 45, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) हे कुटुंबासह त्यांच्या मोटारीतून जात होते. त्यांचा मुलगा मोटार चालवित होता. वैष्णोदेवी मंदिरासमोर आरोपी दुचाकीवरून मोटारीच्या डाव्या बाजूने पुढे जात असताना दुसऱ्या दुचाकीला धडकून खाली पडले. लांडगे यांनी मोटार बाजूने पुढे नेली. यावेळी आरोपींनी मागून पळत येऊन मोटार थांबविण्यास सांगितले व मारहाण केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.