पवार साहेब…तर मग घाबरता कशाला ? सुधीर मुनगंटीवार

मुंबई – “चुकांच्या संदर्भात दखलच घ्यायची नाही अस कस होऊ शकेल. त्यांच्या चुकांबाबत विचारपूसच करायची नाही का? आपल्याला कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार चौकशीला सहकार्य केले पाहिजे. कर नाही तर डर कशाला” अशा शब्दांमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईतल्या ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भातच पवार आज दुपारी 2 वाजत ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत.

दरम्यान, बुधवारी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपण स्वत शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयामध्ये पोलिसांचे पथक हजर झाले असून श्वानपथकाद्वारे तेथे तपासणी केली जात आहे. याचबरोबर शरद पवार यांच्या घरी पोलिसांचे एक पथक हजर झाले आहे. सहायक पोलीस आयुक्त विजय चौबे या पथकासह तेथे उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईमध्ये देखील पोलिसांनी जमावबंदी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.