वाघोली | जिल्हाधिकाऱ्यांची रात्री साडे अकरा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट

सुरळीत सुरु असलेल्या लसीकरणाबाबत केले समाधान व्यक्त; आरोग्य यंत्रणेचेही केले कौतुक

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (ता. हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या 75 तास कोविड प्रतिबंधक लसीकरणास पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अचानक रात्री साडे अकराच्या सुमारास भेट दिली. दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सुरळीतपणे सुरु असलेल्या लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून अहोरात्र प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

स्वातंत्र्याचे 75 वर्ष लक्षात घेता राज्य शासनाकडून मिशन कवचकुंड मोहिमेंतर्गत दोन्ही महापालिका व ग्रामीण भागात 75 तास कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरु असलेल्या लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दिवसा कामामुळे येवू शकत नाहीत अशा कामगारांना रात्रीच्या लसीकरणामुळे लस घेणे शक्य होत आहे.

“पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली असून राज्य लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य शासनाच्या मिशन कवचकुंडल नुसार 10 लाख लसीकरण करण्याचे करण्याच मानस आहे. काही गावे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी भर देणार आहोत.             
– राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे) 

प्राथमिक केंद्रातील योग्य नियोजनामुळे पहिल्याच दिवशी जवळपास 650 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. पुणे जिल्ह्याधिकारी यांनी पहिल्याच दिवशी सोमवारी (11 ऑक्टोबर) रोजी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या लसीकरणास भेट देवून पाहणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी लसीकरणास आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. रात्रीच्यावेळी सुद्धा लसीकरण सुरळीत असल्याचे पाहून त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, वैद्यकीय अधिकारी नागसेन लोखंडे, वैद्यकीय अधिकारी राजेश्री सूर्यवंशी, अॅड. शरद बांदल, आरोग्य सहाय्यिका सुप्रिया पुरोहित, रामनाथ खेडकर, सचिन राखुंडे, आरोग्य सेवक रामकिसन घ्यार, सुनील पडवळ, रंगनाथ वऱ्हाडे, पुष्पा कलकोटे मनीषा दुचे, आदित्य देवरे, दिनेश थोरात, गणेश भीवरे, ओमकार दिघे, महेश सोनटक्के उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.