विदेश वृत्त: इस्रायलशी संबंध सुधारण्यासाठी सुदानचा अमेरिकेबरोबर करार

खार्तुम (सुदान) – इस्रायलबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी सुदानने अमेरिकेबरोबर महत्वाचा करार केला आहे. इस्रायल आणि आखाती देशांबरोबरचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने यापूर्वी “अब्राहम करार’ करण्यात आला आहे. त्यावर संयुक्‍त अरब अमिराती आणि बहारीन या आखाती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

आता सुदान हा त्या करारामध्ये सहभागी होणारा तिसरा आखाती देश ठरला आहे. आज सुदानने इस्रायलबरोबरचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सहमती दर्शवल्यामुळे या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुरळीत होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीवन नुचिन यांच्या उपस्थितीत या महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. महिन्याभरापूर्वीच अमेरिकेने सुदानला दहशतवादी देशांच्या काळ्या यादीतून बाहेर काढले होते. त्यानंतर सुदानमधील सरकारबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू होत्या.

एप्रिल 2019 मध्ये सुदानचे अध्यक्ष उमर अल बशीर यांना पदच्युत करून तेथे नागरी सरकार सत्तेवर आले. या सरकारने अमेरिकेबरोबरचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासूनच जपायला सुरुवात केली आहे. सुदानने इस्रायलबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याच्या भूमिकेने जागतिक बॅंकेनेही सुदानला 1 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले आहे.

सुदानने केलेल्या या करारामुळे सुदानला स्थिरता, संरक्षण आणि आर्थिक विकासाची संधीही मिळणार आहे, असे सुदानमधील अमेरिकेच्या दूतावासाने ट्विटरवर म्हटले आहे.
सुदानने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्येच इस्रायलबरोबरचे संबंध सुरळीत करण्याचे मान्य केले होते. मात्र सुदानच्या संसदेची मंजूरी मिळाल्यानंतरच हा मैत्री करार अस्तित्वात येऊ शकेल, असेही स्पष्ट केले होते. सुदनमधील संसद अद्याप अस्तैअत्वत आलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.