अशी ‘कृत्ये’ मोदी भक्तांचा ट्रेडमार्क – स्वरा भास्कर

दिल्ली –  भारतीय जनता पक्षावर प्रखर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या काँग्रेसच्या प्रचारात गुंतली आहे. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये सहाव्या टप्प्यामध्ये निवडणुका दरम्यान पक्षाच्या प्रचारादरम्यानही स्वराने बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आपले राजकीय विचार मांडले होते. अशातच विमानतळावर एक चाहता स्वराला भेटायला येतो. तो स्वराला सेल्फीसाठी विनंती करतो. स्वरा तयार होते. पण सेल्फी घेण्याऐवजी हा चाहता आपल्या मोबाईलने व्हिडीओ घेतो आणि ‘मॅडम, आएगा तो मोदी ही’ म्हणत स्वराला डिवचतो.  मात्र स्वराने हा व्हिडीओ स्वत: शेअर करत, या चाहत्यांचा समाचार घेतला.

स्वराने ट्विट केले आहे की, ”मी लोकांच्या राजकीय विचारधारेच्या आधारावर भेदभाव करत नाही. पण त्याने मला गंडवून व्हिडीओ शूट केला. अशी कृत्ये भक्तांचा ट्रेडमार्क आहे. त्यामुळे मला काहीही आश्चर्य वाटले नाही. उलट भक्तांचे आयुष्य सार्थकी लावण्यात मला आनंद आहे,’असे स्वराने लिहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.