राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यात मागील 24 तासांत नव्याने 158 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यात बाधितांची संख्या 5682 तर मृतांची संख्या 130 वर पोहोचली आहे.
मागील 24 तासांत राजगुरूनगर (14), चाकण (34), आळंदी (20) या तीन नगरपरिषदां मिळून 68 तर तालुक्यातील ग्रामीण भागातील दोंदे (3), आंबेठाण (2),बिरदवडी (2),चिंबळी (3), कडाचीवाडी (1), खालूंब्रे (1), खराबवाडी (11), कुरुळी (3), महाळुंगे इंगळे (11), मेदनकरवाडी (9), मोई (4), नाणेकरवाडी (9), निघोजे (1), वाकी खुर्द (1), येलवडी (2), बुट्टेवाडी (1), ढोरे भांबुरवाडी (1), होलेवाडी (1), टाकळकरवाडी (1), राक्षेवाडी (2), संतोषनगर (1), सातकरस्थळ (1), सांडभोरवाडी (2), भोसे (2), चऱ्होली खुर्द (1), कयाळी (1), मरकळ (1), पिंपळगाव–गोलेगाव (2), शेलगाव (2), सोळू (1), वडगाव घेनंद(1), रासे (1), शेलपिंपळ्गाव (1), कडधे (1), गुंडाळवाडी (1), जऊळके खुर्द (1), वाफगाव (1) या 38 गावांत 90 असे एकूण 158 पॉझिटिव्ह आढळले आहेत.