पाटणा – भाजपचे फायरब्रॅंड नेते अशी ओळख असणाऱ्या गिरीराज यांनी काल आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या ट्विटर खात्यावरून गिरीराज सिंह यांनी ट्विट करताना त्यासमवेत बिहारमधील नेत्यांची छायाचित्रे पोस्ट केली होती. त्या छायाचित्रांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचाही समावेश होता. स्वत:चा कर्म-धर्म सोडून लोक इतरांच्या धार्मिक विधींचा दिखावा करण्यात पुढे का असतात, अशा आशयाचा सवाल गिरीराज यांनी ट्विटद्वारे केला होता.
गिरीराज सिंह यांच्या त्या आक्षेपार्ह्य ट्विटनंट भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काल इफ्तार पार्ट्यांविषयी वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना सक्त ताकीद दिली होती. तसेच यापुढे वादग्रस्त टिप्पणी टाळण्याचे देखील आदेश शहांनी गिरीराज सिंहांना दिले होते.
अशातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील गिरीराज सिंह यांच्यावर निशाणा साधला असून ते म्हणाले की, “मीडियाच्या प्रकाश झोतात राहण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. अशी वादग्रस्त विधानं करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो.”