शेतकऱ्याची अशीही माणुसकी

वाठार – रेठरे बुद्रूक, ता. कराड येथील तानाजी बाबुराव माने या शेतकऱ्याने स्वत:च्या दहा गुंठे क्षेत्रातील ऊस दुष्काळग्रस्तांना मोफत देत माणुसकीचे दर्शन दाखविले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रेठरे बुद्रुक येथील तानाजी बाबुराव माने यांचे वाठार, ता. कराड येथे स्व:मालकीची शेत जमीन आहे. या जमिनीत त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात ऊसाची लागण केली आहे.

सध्या सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून माण, खटाव, म्हसवडला तर पाणी टंचाईमुळे लोकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लोकांसह, जनावरांचेही पाणी तसेच चाऱ्यावाचून मोठे हाल होऊ लागले आहे. अशा बिकट प्रसंगात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने माने यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या म्हसवड इंटकी या गावातील जनावरांसाठी त्यांनी 10 गुंठ्यातील साधारण 8 टन ऊस कोणत्याही आर्थिक मोबदल्या शिवाय मोफत देऊन सेवाभावी वृत्ती जोपासली आहे. अशा लोकांची खऱ्या अर्थाने समाजाची गरज असून त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. माने यांचा मुलगा व सून सध्या अमेरीकेत उच्च शिक्षण घेत असून आपल्या दातृत्वाने अन्य लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते ही दुष्काळग्रस्तांना मदत करतील, अशा भावना माने यांनी व्यक्त केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.