कामाख्या – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आता सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशावरील कोरोना संकट अधिकच बळावले तर कोरोना कक्षांची संख्या अपुरी पडू नये यासाठी देखील प्रयत्न सुरु असून याचाच एक भाग म्हणून रेल्वेद्वारे देखील रेल्वे गाड्यांमध्ये कोरोना कक्षा उभारण्यात येत आहेत.
असाच कोरोना कक्ष आसाम येथील कामाख्या रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आला आहे. ईशान्य रेल्वे विभागाकडून या कोरोना कक्षाचा फोटो देखील उपलब्ध करून देण्यात आलाय. रेल्वेतर्फे तयार करण्यात आलेल्या एका कोचमध्ये एकावेळी ९ रुग्णांना दाखल केलं जाऊ शकतं अशी माहिती देण्यात आलीये.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला असून गेल्या बुधवारपासून सर्वत्र अंमलबजावणी सुरु झालीये. नागरिकांनी सरकारतर्फे देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन केल्यास देशावरील कोरोना संकट टळू शकते.
Isolation coaches have been prepared by Indian Railways to fight the #CoronavirusPandemic; Visuals from Kamakhya Railway Station (Assam) in Northeast Frontier Railway zone. 9 patients can be accommodated in one coach. pic.twitter.com/rU0A5g39AG
— ANI (@ANI) March 28, 2020