‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं

नवी दिल्ली –  केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आज निती आयोगाची पहिली बैठक नवी दिल्ली येथे सुरु झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनी उपस्थित लावली आहे.

निती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केंद्र सरकारची २०२४ सालापर्यंतची ध्येय धोरणं उपस्थित मान्यवरांसमोर मांडली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मांडलेले ठळक मुद्दे… 

१) २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य जरी अवघड वाटत असले तरी ते अशक्य नाही.

२) राज्यांनी आपली बलस्थाने ओळखून जीडीपी वाढविण्यासाठी जिल्हा पातळीपासून काम करावे.

३) विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था मुजबूत बनवण्यामध्ये ‘निर्यात’ मोठी भूमिका बजावते. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

४) २०२४पर्यंत देशातील सर्व खेड्यांमध्ये पाईपलाइनद्वारे पाणी पुरवठ्याचे उद्दिष्टय असून त्यासाठी राज्य सरकारांनी जल संधारणाचे उपाय राबवायला हवेत.

५) ज्या राज्यांनी केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना राबवली नाही त्यांनी ही योजना राबवावी. आपल्याला २०२५ पर्यंत देशातून टीबी या रोगाला हद्दपार करायचं आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.