चीनकडून उभयचर ड्रोन बोटीची यशस्वी चाचणी

“मरिन लिझर्ड’ची सागरी प्रवासाची क्षमता 1,200 किलोमीटर
जमिनीवर ताशी 20 किलोमीटर वेगाने प्रवास

बिजींग – चीनने जगातील पहिल्या सशस्त्र उभयचर ड्रोन नौकेची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यामुळे एकाचवेळी समुद्रातून आणि जमिनीवरूनही ही ड्रोन नौका आक्रमण करू शकणार आहे. ही ड्रोन नौका चीनच्या वुचांग जहाजबांधणी उद्योग समूहाने विकसित केली असून तिचे “मरिन लिझर्ड’ नाव आहे. या नौकेची चाचणी यशस्वी झाली असून, वुहान येथील कारखान्यातून 8 एप्रिल रोजी बाहेर पडल्याचे वृत्त सरकारी वृत्तपत्राने दिले आहे. ही ड्रोन नौका 1,200 किलोमीटर लांबीचा पल्ला गाठण्यास सक्षम आहे. 12 मीटर लांबीच्या या नौकेला डिझेलचे हायड्रोजेट इंजिन आहे. मरिन लिझर्ड 50 सागरी मैल या कमाल वेगाने प्रवास करू शकते आणि ही नौका शत्रूच्या रडारवर दिसत नाही. तसेच उपग्रहाच्या माध्यमातून मरिन लिझर्डवर नियंत्रण ठेवले जाते, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

समुद्रातल्य पाण्यातून किनाऱ्यावर पोहोचतातच या बोटीतील चार चाके बाहेर पडून ती ताशी 20 किलोमीटर या वेगाने प्रवास करू शकणार आहे. मोठी चाके लावल्यास या नौकेचा कमाल वेग वाढू शकतो. या नौका इलेक्‍ट्रो-ऑप्टिकल सिस्टिमने सज्ज आहे, तसेच यावर दोन मशिनगन, नौका व विमानविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.