अग्नि-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी : भारताने पहिल्यांदाच रात्री केली चाचणी

नवी दिल्ली : भारताने 2000 किमीपर्यंत दूर असलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या अग्नि-2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अणवस्त्र नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची रात्री चाचणी करण्यात आली. गेल्या वर्षीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पण पहिल्यांदाच ते रात्री लॉंच करण्यात आले. या क्षेपणास्त्राची क्षमता 3000 किमीपर्यंत वाढवता येऊ शकते. रात्री एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर याची चाचणी घेण्यात आली. भारतीय संरक्षण दलात हे क्षेपणास्त्र दाखल झाल्यानंतर सुरक्षेला एक नवा आयाम मिळेल असे बोलले जात आहे. अग्नि-2 क्षेपणास्त्राची जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे. त्याची लांबी 20 मीटर आहे आणि 1000 किलोग्रॅम पेलोड घेऊन जाण्याची याची क्षमता आहे. दोन स्टेजमध्ये आपले लक्ष्य साध्य करणारे हे मिसाइल सॉलिड फ्यूएलवर चालते. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने तयार केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.