पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने दि. ११ डिसेंबर रोजरी पादचारी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालिम चौक ते उंबऱ्या गणपती चौक आणि उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत “व्हेइकल फ्री रोड’ करण्यात येणार आहे.
त्यामुळे हा रस्ता वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
दि. ११ डिसेंबर रोजी वाहतुकीचे नियोजन
– लक्ष्मी रस्त्यावर (सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
– सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौकादरम्यान वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रामणे बदल करण्यात येतील.
पर्यायी मार्ग :
– लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
– कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
– लोखडे तालिम चौकाकडून कुंटे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रस्त्याने न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.