GSAT30 launch : जीसॅट 30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली – इस्त्रोच्या जीसॅट 30 उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चालू 2020 वर्षातील इस्त्रोचा अंतरिक्षात प्रक्षेपित झालेला हा पहिलाच उपग्रह आहे. एरेन 5 या अंतरीक्ष प्रक्षेपण यानांतून या उपग्रहाचे आज सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 2 वाजून 35 मिनीटांनी प्रक्षेपण झाले. उड्डाणानंतर 38 व्या मिनीटांत हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत सोडण्यात आला.

प्रक्षेपणानंतर 38 मिनिटे आणि 25 सेकंदानी जीसॅट-30 हा उपग्रह, उपग्रह यानापासून अलग झाला. त्यानंतर लगेचच इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कर्नाटकमधल्या हसन इथल्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने त्याचे नियंत्रण घेतले. 3357 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कक्षेतल्या काही उपग्रहांच्या कार्यात्मक सेवांना अखंडता पुरवणार आहे. इनसॅट-4ची जागा जीसॅट-30 घेणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.