वॉशिंग्टन : चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या करोनावरील लशीच्या मानवावरील चाचणीचा पहिला टप्पा पार पडला. त्यात ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाभयानक करोनापासून लोकांचे संरक्षण आता दृष्टीक्षेपात आल्याचे मानले जात आहे.
न्युयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या चाचणी घेतलेल्यांमध्ये टी सेल नावाच्या रोगप्रतिकारक पेशी दोन आठवड्यात तयार झाल्या. रोगप्रतिकारशक्ती होण्यासाठी यानंतर 28 दिवसांचा कालावधीलागला. पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रयोगशाळांद्वारे 18 ते 60 वयोगटातील 108 जणांवर ही चाचणी घेण्यात आली.
या चाचणीचे निष्कर्ष लॅनसेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे लसीकरण केल्यानंतर 28 दिवसांनी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्याच्या टी पेशी तयार होण्यास 14 दिवसांनी प्रौढांमध्ये सुरवात होते. मात्र याल शीवर आणकी संशोधन होणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे.
या चाचणचिे निष्कर्ष खूपच कमी कालावधीच्या तपशीलावर आधारीत आहेत. त्यामुळे या लशीचा प्रभाव किती काल राहतो हे समजू शकले नाही. ही लस दिल्यानंतर ताप, थकवा, डोकेदुखी आणि स्नायुदुखी हे दुष्परिणअम आढळून आले आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.