ग्रामपंचायत संघटनेच्या आंदोलनाला यश

शासनाने मागण्या मान्य केल्याची अध्यक्ष वावळ यांची माहिती

वाघळवाडी- राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि.16) केलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. संघटनेच्या बहुतांशी मागण्या शासनाने मान्य केल्या असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याचे पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वावळ यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास संघटनेचे संस्थापक सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे व अध्यक्ष राजेंद्र वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक अध्यक्ष धनाजी ढावरे, सरचिटणीस सुभाष तुळवे, विभागीय अध्यक्ष संतोष तुपे, ज्येष्ठ सल्लागार खंडूजी घोटकुले, पापा भाई तांबोळी, उपाध्यक्ष अनिल सांगडे, कोषाध्यक्ष हनुमंत पोळ, सहकोषाध्यक्ष नारायण खाणेकर, प्रसिद्धी प्रमुख राहुल तावरे, महिला अध्यक्षा सुजाता आल्हाट,उपाध्यक्षा सुनिता लांडगे, सरचिटणीस मनीषा केदारी, महिला सदस्य सुषमा कांबळे यांच्या उपस्थिती पार पडले.

या आंदोलनास पुणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव नागरगोजे यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलून ग्रामविकास खात्याचे मुख्य सचिव माननीय असीम गुप्ता यांच्याबरोबर चर्चा घडवून आणली. मंगळवारी (दि. 17) संघटनेच्या शिष्ट मंडळाबरोबर ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची सकारात्मक चर्चा पार पडली. निवेदनातील प्रत्येक मुद्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून याबाबतचे आदेश लवकरच जारी करण्यात येतील, असे चर्चेअंती सांगण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाव्हळ, विभागीय अध्यक्ष संतोष तुपे, सहकोषाध्यक्ष नारायण खाणेकर व जिल्हा संघटनेचे सदस्य रामदास जंगम उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.