पाचगणी – दुर्गम भागातील रुग्णांच्या सेवेकरीता उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक अ़डचणींचा सामना करावा लागतो आहे. अपुरी यंत्रणा, कर्मचाऱ्यांचा अभाव यासह वैद्यकीय उपकरणांची कमतरता नेहमीच बघायला मिळते.
जावली येथील मेढा ग्रामीण रुग्णालयात शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून नवजात शिशुंसाठी बेबी वार्मर फोटोथिअरपी मशीनची मान्यता मिळवून घेतली आहे.
याबाबतचे पत्र जिल्हा शल्यचिकीत्सक डॅाक्टर चव्हान यांना देण्यात आले असून लवकरच मेढा ग्रामीण रुग्णालयात हे उपकरण उपलब्ध होणार असल्याची माहिती एकनाथ ओबळे यांनी दिली आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयात उपकरणांच्या अभावी रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच नवजात शिशुसाठी आवश्यक उपकरणं नसल्याने प्रस्तुतीनंतर महिलांना साताऱ्याच्या जिल्हारुग्णालयात जावे लागत होते. यामुळे प्रसुती मातांची व नवजात शिशुंची गैरसोय होत होती.
दरम्यान, या समस्यांची दखल घेत एकनाथ ओबळे यांच्या प्रयत्नातून ही समस्या मार्गी लागली आहे. त्यांच्याबरोबर प्रशांत जुनघरे,लहुराज सुर्वे, विनायक सुर्वे, तुषार पार्टे, विशाल सुर्वे सखाराम साळुंखे आदी शिवसैनिकांनी महत्वाची भूमीका बजावली आहे.