शिरूर, दि. 29 (प्रतिनिधी) -शिरूर शहरातील आर.एम.धारिवाल, न्यू इंग्लिश स्कूल, विजयमाला विद्या मंदिर या तीन शाळांचा दहावीचा निकाल 100 लागला आहे. शहरातील विद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे – विद्याधाम प्रशालेचा निकाल 99.75 लागला आहे. प्रशालेतील पूजा बोरकर (99), सृष्टी आवटी (97.40), दिव्या भळगट (97.40) गौरी थोरात (97.20) गुण मिळवत यश मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बाफना, सहसचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापक तांबोळी, उपमुख्याध्यापक जैन, पर्यवेक्षक काकडे यांनी अभिनंदन केले.
शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा इंग्रजी माध्यमाचा 100 , तर मराठी माध्यमाचा 99.5 निकाल लागला आहे. अक्षता कापरे (94.20 ) प्रथम, अथर्व कुलकर्णी (93.40 ) द्वितीय, सौरभ थोपटे (92.40 ) तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण, मुख्याध्यापिका ए. ए. डोंगरे, माजी मुख्याध्यापक साहेबराव चांगले यांनी अभिनंदन केले. शिरूर येथील विजयमाला विद्यामंदिर स्कूलने 100 यशाची परंपरा कायम राखली आहे. अनुक्रमे – विधी बोथरा 95.20, वैष्णवी दुंडे 93.60, गजानन बोरे 91, श्रुती फलटणकर 90.60, आर्यन नगरे 88.60, कुणाल भोसले 87.60.
बेट भागातील विद्यालयांचे यश
टाकळी हाजी -गुरुनाथ विद्यालय वडनेर खुर्द (ता. शिरुर) या विद्यालयाने दहावी परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. नूतन निचीत 95.40, सारिका चौधरी 91, दिशा जगदाळे 90.80 यांनी पहिल्या तीनमध्ये यश मिळवल्याचे मुख्याध्यापक जनार्दन साबळे यांनी सांगितले. ग्रामविकास शिक्षण संस्था टाकळी हाजी संस्थेच्या विद्यालयांनीही भरभरून यश मिळवल्याचे प्राचार्य आर.बी.गावडे यांनी सांगितले.
टाकळी हाजी- 97.91 यात साक्षी किऱ्हे 94.20, पायल खटाटे 93.20 दिपाली कांदळकर 89.8 यांनी यश मिळवले. म्हसे बुद्रुक- 98.11, चांडोह 96.77, गुनाट 93.91 असा या शाळांचा निकाल लागला. जय मल्हार विद्यालय जांबूत या शाळेचा देखील 99.18 लागल्याचे मुख्याध्यापक आर. एस. कापसे यांनी सांगितले. यात रितेश राऊत 97.40, रामेश्वरी केदारी 96.20, प्रांजल जगताप 95.4 यांनी यश मिळवले.
संभाजीराजे विद्यालय अव्वल
शिक्रापूर -जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील संभाजीराजे विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. प्रतिक गोरडे 94, रितेश वारे 93, पूजा वाघमारे 92.20 यानी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
करंदीच्या शाळेचा 99 निकाल
केंदूर -करंदी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर शाळेचा निकाल 99 लागला आहे. विद्यालयातील दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 84 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये श्रावणी साकोरे प्रथम, श्रद्धा ढोकले द्वितीय आणि ऋतुजा साकोरे तृतीय तर आशा कंद्रुप हिने चौथा क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाची पहिल्या चार क्रमांकाची मुलींची परंपरा कायम ठेवली आहे.
मुखईची पलांडे आश्रमशाळा यशस्वी
शिक्रापूर -मुखई (ता. शिरूर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल 100 लागला आहे, अशी माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली आहे. मुखई येथील कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रमशाळेने सलग 12 वर्षांची निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थी – तनुजा पडळकर (94.60), भारती वडते (92.80), अंजुश्री राजपूत (92.60).
विद्याधाम प्रशालेचा 94.48 टक्के निकाल
शिक्रापूर -येथील विद्याधाम प्रशालेचा निकाल 94.48 टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य रामदास चव्हाण यांनी दिली. आदिती करंजे 95.80, आरती म्हस्के 95.60, शुभम तांबे 94.80 यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.