जिद्दीमुळेच यश मिळाले – अंजू बॉबी जॉर्ज

नवी दिल्ली  -एक मूत्रपिंड निकामी झालेले असतानाही मी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकले ते केवळ जिद्दीच्या जोरावर, अशा शब्दांत भारताची लांब उडी क्रीडा प्रकारातील माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिने आपल्या यशाचे रहस्य उघड केले. 

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवण्याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मी पदके मिळवली. मात्र, माझे एक मूत्रपिंड निकामी झालेले असताना हे यश मिळवू शकले याचा अभिमानही वाटतो.

वेदनाशामक औषधे घेत मी सराव केला, तसेच स्पर्धांमध्ये सहभागही घेतला व पदकेही पटकावली. केवळ जिद्दीच्या जोरावरच हे यश पाहू शकले, असेही तिने सांगितले. अशा परिस्थितीत सातत्यपूर्ण कामगिरी करणारी मी पहिलीच खेळाडू असेन. जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.