जळोची -राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. कर्जत शहरात लोकांमध्ये जाऊन लोकांचे विषय समजुन घेऊन आम्ही ही निवडणुक लढवली त्याला कर्जत शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
जाहिर झालेल्या नगरपंचायत निकालांमध्ये कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. 12 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर 3 जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.