पृथ्वीजवळ नवजात ग्रह शोधण्यात यश

वॉशिंग्टन : रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने नवा भव्य ग्रह पृथ्वीजवळ शोधला आहे. या नवजात ग्रहाचे नाव 2 मास 1155-7919 बी असे ठेवण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीपासून तो केवळ 330 प्रकाश वर्ष दूर आहे.
अमेरिकन ऍस्टॉनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोटस्‌मध्ये हा शोध प्रसिध्द करण्यात आला आहे. वायु आवरणापासून ग्रह बनण्याची प्रक्रियेवरचे नवे संशोधन मांडण्यात आले आहे. हा सापडलेला पदार्थ अत्यांत शीत असून तो गुरूच्या 10 पट मोठा आहे.

म्हणजेच हा ग्रह नवजात असावा. त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत तो असावा, असे अनी डिकस्न-व्हॅडरवेल्डे यांनी म्हटले आहे. त्या या शोध निबंधाच्या प्रमुख लेखिका आहेत. त्या वेस्ट कोलंबिया विद्यापीठात पीएच. डी. करत आहेत. केल्पर मोहीम आणि त्या सारख्या मोहीमांद्वारे यापुर्वीचे ग्रह शोधण्यात आले आहेत. मात्र हे सर्व जुने ग्रह आहेत. आपल्या पालक ग्रहापासून येवढ्या दूर सापडलेला हा चौथा किंवा पाचवा ग्रह असेल.

मात्र त्याची निर्मिती कशी झाली किंवा त्याचा शेवट कसा होईल, याची मांडणी करण्यात तज्ज्ञ गुंतले आहेत. गिया अवकाश संशोधन केंद्रातील डाटाच्या सहायाने संशोधन करण्यात आले आहे. हा नवजात ग्रह हा 50 लाख वर्ष जुना असावा. आपल्या सुर्यापेक्षा एक हजार पट तो वयाने लहान आहे. पृथ्वी सुर्यापासून जेवढी दूर आहे, त्या तुलनेत 600 पट दूर हा ग्रह त्याच्या सूर्यापासून आहे. आपल्या मुळ ताऱ्यापासून येवढ्या लांब त्याचे अस्तित्व आश्‍चर्यकारक मानले जात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.