पी.व्ही.नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. केंद्र सरकारला नरसिंह राव यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची आठवण करून देत स्वामी यांनी ही मागणी केली आहे..

आगामी प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्याची दखल घेत त्यांला भारतरत्न द्यावी असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, जम्मू-काश्‍मीरविषयीचे त्यांचे निर्णय आणि राम मंदीरावरील त्यांचे मत यासर्व निर्णयाची सरकारला यावेळी आठवण करून दिली. नरसिंह राव यांनी केवळ देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर काश्‍मीर मुद्यावर संसदेत प्रस्तावदेखील पारित केला. तसेच सर्वोच्च न्यायालयात जर वादग्रस्त जमीनीवर अगोदर मंदीर होते आणि त्यानंतर तिथे मशिद बांधून पाडले असेल तर ती जागा सरकार हिंदूंनाच देणार असल्याचा महत्वाचा निर्णय राव यांनीच घेतला होता असेही स्वामी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्या अगोदर तेलंगणा सरकारनेदेखील पी.व्ही.नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.