नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत मंदिराच्या उभारणीला सुरुवात- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली – येत्या नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. आज सुब्रमण्यम स्वामी यांचा वाढदिवस असून ते एका कार्यक्रमानिमित्त अयोध्येत आले होते. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणले कि, लवकरच न्यायालय अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला. श्रद्धा हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. हा हक्क कोणापासूनही हिरावून घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे रामाचा जन्म झाला आहे, तेथून त्याचे मंदिर हटवता येणार नाही, असं सुद्धा स्वामी म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here