मुंबई- महाराष्ट्राचा बहुआयामी अभिनेता सुबोध भावेचा आज वाढदिवस आहे. सिनेसृष्टीतील अनेकांनी वेगवेगळ्या स्वरुपात सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चांगल्या आणि कसोट्या असलेल्या भूमिका उत्तमरित्या निभावल्या. आतापर्यंत अनेक बायोपिकमधील भूमिका उत्तम पेलल्या आहेत.
आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, लोकमान्य – एक युगपुरुष या बायोपिकमध्ये काम करणं त्याच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरला.
मराठी बायोपिक आणि अभिनेता ‘सुबोध भावे’ यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’,’प्रल्हाद केशव अत्रे’ अशा अनेक बायोपिक गाजल्या आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ हा पहिलाच चित्रपट हिट करून आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वीरीत्या कसं वावरायचं हे सुबोध कडून सगळ्या कलाकारांनी शिकण्यासारखं आहे.
त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत. सुबोध भावेंनी 50 पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे.
घुमान येथे 2015 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या ‘महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता.