सुबोध भावे पुन्हा रुपेरी पडद्यावर

पुणे – चंद्र आहे साक्षीला मालिकेतील श्रीधर काळेच्या खलनायकी भूमिकेनंतर अभिनेता सुबोध भावे पुन्हा मोठ्या पडद्याकडे वळत आहे. “कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर आधारित चित्रपट सुबोध भावेने दिग्दर्शित केला होता. 

या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सुबोध भावे आणखी एक शिवधनुष्य पेलणार आहे. बालगंधर्वांचे “संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर “मानापमान’ चित्रपटाद्वारे साकारले जाणार आहे.

या चित्रपटाची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान करण्यात आली. पुढील वर्षी (2022) दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे टीझर पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिले होते. आता शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.