नवी दिल्ली – जर तुम्ही स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि डेबिट कार्ड वरून इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आत्यंतिक महत्त्वाची आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले की, डेबिट कार्डवरून जर तुम्हाला कोणत्याही अडचणीविना देवाण-घेवाण करायची असेल तर तुम्हाला बॅंकेत आपले पॅन कार्ड नंबर तातडीने अपडेट करावे लागेल.
मात्र, हे पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही बॅंकेत किंवा तुमचे खाते असलेल्या शाखेतच गेले पाहिजे, असे नाही. पॅन कार्ड नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीचे करता येऊ शकते. तुम्हाला शक्य असेल तर प्रत्य्क्ष बॅंकेच्या शाखेत जाऊन सुद्धा तुम्हाला हे अपडेट करता येऊ शकते. गेल्या वर्षी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन नियमासंबंधी रिझर्व्ह बॅंकेने काही बदल केले आहेत.
एसबीआयने सोशल मीडिया साइट ट्विटरवर ही माहिती दिली आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये काही अडचण येत आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. एसबीआय डेबिट कार्ड द्वारे कोणत्याही अडचणीविना विदेशी देवाण-घेवाण सुरू ठेवायची असेल तर बॅंकेत आपल्या रेकॉर्डनच्या पॅन कार्डची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
स्टेट बॅंकेच्या या सूचनेमुळे आता बहुतांश बॅंका या मोहिमेचे अनुकरण करण्याची शक्यता आहे.