भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे की, देशातील सुभाषिनी अय्यर अंतराळावर संशोधन करणारी अमेरिकन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात काम करत आहेत.
सुभाषिनी अय्यर या चंद्र आणि त्यापलीकडे अंतराळ यान पाठविण्यासाठी नासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील रॉकेट कोअर स्टेजची देखरेख करीत आहेत.
सुभाषिनी अय्यर कोईम्बतूरमध्ये जन्मली असून गेल्या दोन वर्षांपासून ती स्पेस लॉंच सिस्टमशी (एसएलएस) संबंधित आहे. सुभाषिनी 1992 मध्ये तिच्या महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त करणारी पहिली महिला अभियंता ठरली होती.
सुभाशिनी अय्यर यांनी सांगितले की, आपण चंद्रावर अखेरचे गेलो त्यालाही आता 50 वर्षे झाली आहेत. मानवांना पुन्हा चंद्रावर आणि मंगळाच्या पलीकडे नेण्यास तयार आहोत.
नासाचा आर्टेमिस हा चंद्र अन्वेषण कार्यक्रम चंद्राबद्दल अधिक माहिती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि प्रणाली वापरतो . नासा चंद्रासंदर्भात दोन मोहिमा सुरू करणार आहे, जेणेकरून चंद्राच्या तळाविषयी अधिक माहिती समजू शकेल.
आर्टेमिस तीन चंद्र पृष्ठभागावर प्रथम महिला आणि पुरुष अंतराळवीर घेऊन जाणार आहे. या मोहिमेद्वारे, चंद्राच्या पृष्ठभागावरील घर्षण आणि अन्य तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे.