Subhash Ghai | प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. 79 वर्षीय सुभाष घई यांना श्वसनाचा त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
परंतु सुभाष घई यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारू शकते अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. श्वासासंबंधी तक्रारी, अशक्तपणा, सतत चक्कर येणे, स्मृती कमी होत जाणे आणि बोलताना अडचण येणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. दोन दिवसांनी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचीही शक्यता आहे.
घई यांच्या निकवर्तियाने सांगितले की, “सुभाष घई आता स्वस्थ आहेत. त्यांना नियमित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आणि आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यवाद.” Subhash Ghai |
दरम्यान, सुभाष घई यांनी ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘विधाता’, ‘मेरी जंग’, ‘कर्म’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘ताल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी शेवटचा ‘कांची’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. Subhash Ghai |