बारामती । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 9 जूनपासून सुरू

जळोची – कोवीड – 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, शासनाच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथील कामकाज स्थगित ठेवण्यात आले होते.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , बारामती येथील कामकाज दिनांक 9 जून 2021 रोजी पासून सुरू करण्यात येत आहे. परंतु गर्दी टाळण्याच्या हेतूने मर्यादीत स्वरूपात कामकाजास सुरूवात होणार आहे.

त्यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती दिवसाला 40 , पक्की अनुज्ञप्ती दिवसाला 40, अनुज्ञप्ती नुतनीकरण व अनुज्ञप्तीविषयक इतर कामकाज दिवसाला 25 अर्ज, योग्यता प्रमाणपत्र (सी.एफ.आर.ए) दिवसाला 27, वाहन हस्तांतरण, वाहनावर बोजा चढवणे, उतरवणे व इतर कामकाज (परिवहनोत्तर विभाग) दिवसाला 30 अर्ज,

वाहन हस्तांतरण, वाहनावर बोजा चढवणे, उतरवणे व इतर कामकाज(परिवहन विभाग) दिवसाला 15 अर्ज या प्रमाणे कामकाज सुरू राहील असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.