सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस : प्रज्ञेश, दक्ष, क्रिशांकची आगेकूच

मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रज्ञेश शेळके, दक्ष पाटील, क्रिशांक जोशी, शार्दूल खवळे, जय गायकवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्‍स येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या प्रज्ञेश शेळकेने आपलाच सहकारी विमल धैर्यचा टायब्रेकमध्ये 9-8(4) असा पराभव केला.

महाराष्ट्राच्या दक्ष पाटीलने कर्नाटकाच्या अर्श वाळकेचा 9-1 असा सहज पराभव केला. क्रिशांक जोशीने अनुराग पाटीलला 9-0 असे नमविले. महाराष्ट्राच्या शार्दूल खवळेने कर्नाटकाच्या प्रणित पॉलचा 9-1 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

दुसरी पात्रता फेरी : मुले : प्रज्ञेश शेळके(महाराष्ट्र) वि.वि.विमल धैर्य(महाराष्ट्र) 9-8(4); ईशान बदागी(कर्नाटक) वि.वि.मनन राय(महाराष्ट्र)9-4; शार्दूल खवळे(महाराष्ट्र) वि.वि.प्रणित पॉल(कर्नाटक) 9-1; विहान जैन(हरियाणा) वि.वि.अवी मिश्रा 9-1; दक्ष पाटील(महाराष्ट्र) वि.वि.अर्श वाळके(कर्नाटक) 9-1; क्रिशांक जोशी(महाराष्ट्र)वि.वि.अनुराग पाटील(महाराष्ट्र) 9-0; जय गायकवाड(महाराष्ट्र) वि.वि.रिषभ मोदी(महाराष्ट्र) 9-5.

पहिली पात्रता फेरी : मुली : रितिका दावलकर वि.वि. अनन्या यादव(महाराष्ट्र) 9-2; अनन्या भुतडा(महाराष्ट्र) वि.वि.ऐश्‍वर्या स्वामीनाथन(महाराष्ट्र)9-2; यशिता इरिती(तेलंगणा) वि.वि.क्रितीयानी घाटकर 9-6; सौम्या तमंग(महाराष्ट्र)वि.वि.सहस्रा रेड्डी(तेलंगणा) 9-3.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.