बंगळुरू – कर्नाटकातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा देतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हयरल झाल्याचे पहायला मिळत आहेत. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील ‘भगत प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधील’ हे फोटो आहेत. या महाविद्यालयात सध्या परिक्षा सुरू आहेत. परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी विद्यार्थ्यांना चक्क रिकामी खोकी घालून परिक्षेला बसवण्यात आल्याचे दिसत आहे. हे फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
Karnataka: Students were made to wear cardboard boxes during an exam at Bhagat Pre-University College in Haveri, reportedly to stop them from cheating. (16.10.2019) pic.twitter.com/lPR5z0dsUs
— ANI (@ANI) October 18, 2019
विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परिक्षा द्यावी यासाठी ही अतरंगी कल्पना साकारण्यात आली. ही व्यवस्था महावि्द्यालयाच्या प्रशासनाने केली होती. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ही रिकामी खोकी घालून त्यांना झाकण्यात आले आणि या अवस्थेत विद्यार्थी पेपर देत आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परिक्षेसाठी कर्नाटकचा हा फॉर्म्युला चांगलाच व्हायरल होतान पहायला मिळत आहे.