मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी, पालक आणि उपस्थित ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
मुख्याध्यापक संतोष थोरात यांनी मार्गदर्शन केले. नेहरू यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष थोरात, रमेश लोहकरे, उमेश लोहकरे, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे, लीलाबाई लोहकरे, योगिता भोमाळे, रोशन लोहकरे, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी प्रसाद कोकाटे, साहिल लोहकरे, सुमित लोहकरे, प्रतिक कुऱ्हाडे, ऋतुजा भोमाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
- याप्रसंगी नेहरू यांच्या जीवनचरित्रावर आधारित सलाम चाचाजी हा माहितीपर चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका अलका गुंजाळ यांनी केले. तर संतोष थोरात यांनी आभार मानले.
सुरवडला अनोखा जागर
रेडा -सुरवड येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधून नागरिक, पालकांच्या उपस्थितीत सामूहिक तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. यावेळी आरोग्य अधिकारी स्नेहल पवार, मुख्याध्यापक दत्तात्रय तोरसकर, विजय खामगळ, भिमराव आवारे, प्रकाश धुमाळ, भागवत नाईक, संजय सोंग, विजया गदादे, सारिका खरात, भारती मोरे, अलका माने, आशा बनसोडे उपस्थित होते.