विद्यार्थ्यांनी कोल्हापूरमधील समस्यांचा अभ्यास कराव- महापौर

कोल्हापूर /प्रतिनिधी :- आपल्या समोर नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक समस्या उभ्या असून त्या सोडविण्यासाठी विज्ञान शिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरस्तरावरील अनेक समस्यांचा अभ्यास कराव, समस्यां सोडविण्यासाठी उपाय योजना सुचवाव्यात असे प्रतिपादन महापौर ऍ़ड.सौ.सूरमंजिरी लाटकर यांनी केले.
विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय असून विद्यार्थ्यांचे 80 व शिक्षकांचे 10 असे एकूण 90 विज्ञानाची उपकरणे यात मांडण्यात आलेली आहेत. या प्रदर्शनामध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग नोंदविला आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 45 व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर संजय मोहिते होते. यावेळी विज्ञान कमिटी प्रमुख बाळासाहेब कांबळे, पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, लेखापाल बाबा साळोखे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.