विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीमध्ये संशोधन करावे

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन

रांजणी -विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने होमिओपॅथीमध्ये निष्णात असलेल्या डॉक्‍टरांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले.

होमिओपॅथीमध्ये निष्णात असलेले आणि गेले चाळीस वर्ष होमिओपॅथी उपचाराच्या माध्यमातून गंभीर आजार झालेल्या रुग्णांना बरे करणाऱ्या पिंपरी येथील होमिओपॅथीक तज्ञ डॉ. अमरसिंह दत्तात्रय निकम यांना मुंबई येथे महाराष्ट्र कौन्सील ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार मंगळवारी (दि. 28) वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथी मेडीकल कॉलेजस ऑफ महाराष्ट्रचे सचिव पृथ्वीराज पाटील यावेळी उपस्थित होते.

डॉ. अमरसिंह निकम यांचे होमिओपॅथीतील योगदान नवोदित होमिओपॅथीक डॉक्‍टरांना दिशा देणारे आहे. गेली चार दशके रुग्णांची सेवा करुन गंभीर आजारांना बरे करुन डॉ. निकम यांनी अनेकांना जीवदान दिले असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार मिळविलेल्या डॉक्‍टरांची नावे पुढीलप्रमाणे- डॉ. संजीव मनोहर डोळे (पुणे), डॉ. अमरसिंह दत्तात्रय निकम, डॉ. अभय शामकांत तळवळकर (पुणे) तसेच ठाण्याचे डॉ. मिलिंद वासुदेवराव आणि परभणीचे डॉ. संदिप सोनापंत नरवाडकर यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.