हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा “रन मुळशी रन’ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिरंगुट – पृथ्वी वाचवा, देश वाचवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्ञानदीप शिक्षण संसथेच्या हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “रन मुळशी रन’ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इयत्ता 1ली ते 10 वीच्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा पूर्ण करत मुळशी तालुक्यातील आपली शारीरीक क्षमता दाखवून दिली.
संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भिलारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, यशस्विनी रसाळ-भिलारे व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान मुलांसाठी ठिकठिकाणी रुग्णवाहिकेची आणि पाणी व्यवस्था करण्यात आली होती. सुमित शहा, साक्षी ववले, वेदांत पवळे आणि कल्याणी सुतार या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
लहान मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलतर्फे तीन किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा मॅरेथॉनचे पाचवे वर्ष होते.
पिरंगुट येथील कॅम्पपासून कासारआंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलपर्यंत तीन किमी अंतराची ही स्पर्धा होती, असे अध्यक्ष कृष्णा भिलारे व संचालक कुणाल भिलारे यांनी सांगितले. इयत्ता तिसरी ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तर पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल :
हाफ मॅरेथॉन (1 ली ते 3 री) – मुली : कल्याणी सुतार, सानिका क्षीरसागर, देवांगी पतंगे. मुले : वेदांत पवळे, श्रवण रांजणे, अनुकल्प मारणे. फुल मॅरेथॉन (4थी ते 10वी) – मुली : साक्षी ववले, श्रेया ववले, समीक्षा वाकोडे. मुले : सुमित शहा, अनुज मारणे, पियुश जाधव.