परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची “ऑनलाइन’ पसंती

1 लाख 83 हजार म्हणजेच 85 टक्‍के जणांनी निवडला पर्याय

  • 1 लाख 3 हजार विद्यार्थी करणार मोबाइलचा वापर
  • त्यानुसार विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन करणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन या दोन पर्यायातून 1 लाख 83 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. यातील 1 लाख 3 हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलवरून परीक्षा देणार आहेत. जवळपास 85 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेस पसंती दिल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठाने पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या 1 ऑक्‍टोबरपासून घेण्याचा निर्णय घेतला.

त्यापूर्वी विद्यापीठ ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पर्यायातून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहे. ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठ ऑफलाइनचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला होता.

दरम्यान, विद्यापीठाने मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष परीक्षा देण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन पर्याय निवडण्यासाठी लिंक खुली केली होती. त्यावर दि. 14 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.