इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मूळ गुणपत्रिका मिळणार

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून मंगळवारी (दि.11) करण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 28 मे रोजी लावण्यात आला होता. विद्यार्थींनी ऑनलाइन निकालाच्या प्रिंट काढून घेतल्या होत्या. त्यांना मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागली होती.

पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केंद्रावरुन मंगळवारी सकाळी 11 ते 3 यावेळेत वितरीत करण्यात येणार आहे.

महाविद्यालयांना येथून मिळतील गुणपत्रिका पुणे, पुरंदर, हवेली तालुक्‍यातील महाविद्यालयांसाठी शिवाजीनगर येथील एस.एस.पी.एम.एस. हायस्कूलमध्ये वाटप केंद्र असणार आहे. पिंपरी- चिंचवड शहर, मावळ, मुळशी तालुक्‍यांसाठी पिंपरी येथील जयहिंद हायस्कूल, बारामती, दौंड, इंदापूरसाठी बारामतीमधील एम.ई.एस.हायस्कूल, आंबेगाव व जून्नर मधील महाविद्यालयांसाठी नारायणगावमधील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरात, खेड व शिरुरसाठी शिक्रापूरमधील सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये वाटप केंद्र सुरू राहणार आहे.

नगर शहर, पाथर्डी, पारनेर, शेवगावसाठी नगरमधील ए.इ.सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्‍यांसाठी कर्जतमधील महात्मा गांधी विद्यालय, संगमनेर, अकोले तालुक्‍यांसाठी संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ सह्याद्री विद्यालय, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, राहूरी, राहाता तालुक्‍यांसाठी श्रीरामपूरमधील के.के.सोमय्या हायस्कूल, सोलापूर शहर, अक्कलकोट, मोहोळसाठी सोलापूरमधील छत्रपती शिवाजी प्रशाला, बार्शी, माढा, करमाळा तालुक्‍यांसाठी बार्शीमधील सुलाखे हायस्कूल, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला तालुक्‍यांसाठी पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वाटप केंद्र असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)