प्रश्‍नपेढीला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेचा सराव करता यावा यासाठी विद्या प्राधिकरणाकडून उपलब्ध

 

पुणे – इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा सराव करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) विषयनिहाय प्रश्‍नपेढी उपलब्ध करून दिली आहे. त्याला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दहावी, बारावीच्या एप्रिल-मेमध्ये ऑफलाइनद्वारे परीक्षा होणार आहेत. दहावीच्या मराठी माध्यमाच्या 8, इंग्रजी 4, उर्दू 11 याप्रमाणे विषयनिहाय प्रश्‍नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मराठी माध्यमासाठी गणित भाग 1 व 2, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व 2, इंग्रजी आदी विषयांचा समावेश आहे.

इंग्रजी माध्यमातील इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल, अक्षरभारती, इंग्रजी या विषयांचा समावेश आहे. उर्दू माध्यमातील मराठी, उर्दू भाषा, भूगोल, इतिहास, गणित भाग 1 व 2, विज्ञान भाग 1 व 2, अरेबिक अशा विषयांचा समावेश आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या 12, मराठी माध्यमाच्या 2, उर्दू माध्यमाच्या 11 याप्रमाणे विषयनिहाय प्रश्‍नपेढी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात इंग्रजी माध्यमातील गणित व संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रशियन, भूगोल, संगणक विज्ञान भाग 1 व 2, जर्मन, रशियन याविषयांचा समावेश आहे.

मराठी माध्यमातील इतिहास, भूगोल तर उर्दू माध्यमातील इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, एसपी, ओसी, गणित या विषयाच्या प्रश्‍नपेढी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दहावी, बारावीच्या उर्वरित विषयांच्या प्रश्‍नपेढीही लवकरच उपलब्ध होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.